msme (1)

मुंबई: महाराष्ट्र लघुउद्योग विकास महामंडळ मर्यादित यांच्या वतीने जागतिक एमएसएमई दिनानिमित्त 27 जून 2026 रोजी वाशी येथील सिडको प्रदर्शन केंद्रात ‘महाराष्ट्र MSME परिषद व MSME पुरस्कार 2026’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी 9 ते सायंकाळी 5.30 या वेळेत होणाऱ्या या परिषदेसाठी राज्यातील सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग (MSME) क्षेत्रातील उद्योजकांना मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

‘संकल्पातून सिद्धीकडे – From Commitment to Achievement’ ही यंदाच्या परिषदेची MSME Conference संकल्पना असून राज्यभरातील 2,500 हून अधिक MSME उद्योजक, वित्तीय संस्था, उद्योगतज्ज्ञ, गुंतवणूकदार तसेच आंतरराष्ट्रीय प्रतिनिधी सहभागी होणार आहेत. निर्यातवृद्धी, कृत्रिम बुद्धिमत्ता, डिजिटल परिवर्तन, अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब, शाश्वत औद्योगिक विकास, वित्तपुरवठा आणि महिला उद्योजकता यांसारख्या महत्त्वपूर्ण विषयांवर विविध चर्चासत्रांचे आयोजनही करण्यात येणार आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस CM Devendra Fadanvis, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे DCM Eknath Shinde, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार DCM Sunetra Ajit Pawar, उद्योगमंत्री डॉ.उदय सामंत Minister of Industries Uday Samant यांच्या उपस्थितीत होणाऱ्या या परिषदेदरम्यान महाराष्ट्रातील उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या उद्योगांचा गौरव करण्यासाठी महाराष्ट्र MSME पुरस्कार 2026 प्रदान करण्यात येणार आहेत. यामध्ये कारागीर व हस्तकला, नेक्स्टजेन MSME, डिजिटल व AI उत्कृष्टता, सेवा, उत्पादन, हरित उद्योग, महिला उद्योजक, निर्यात आणि चॅम्पियन MSME अशा नऊ श्रेणींचा समावेश आहे. चॅम्पियन MSME पुरस्कार वगळता इतर सर्व श्रेणींमध्ये ‘एक्सलन्स’ आणि ‘अचिव्हर्स’ या दोन उपश्रेणींमध्ये पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत.

या पुरस्कारांद्वारे राज्यातील नाविन्यपूर्ण, तंत्रज्ञानाभिमुख, निर्यातक्षम आणि प्रगत MSME उद्योगांना प्रोत्साहन देण्यात येणार आहे. परिषदेसाठी सर्व MSME उद्योजकांना https://mahamsmeawards.in/summit/ या वेबसाईटवर मोफत नोंदणीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असून जास्तीत जास्त उद्योजकांनी नोंदणी करून सहभाग नोंदवावा. तसेच MSSIDC संकेतस्थळ  https://mssidc.maharashtra.gov.in/home/index तसेच  ७७१००००९४४ / ७७१००००९५४ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन महाराष्ट्र लघुउद्योग विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *