bmc school4

महापौर रितू तावडे यांची प्रमुख उपस्थिती

अंधेरी: अंधेरी पूर्व, कोंडीविटा, महेश्वरी नगर येथील नूतन ‘मुंबई पब्लिक स्कूल’ Mumbai Public School इमारतीचे लोकार्पण शनिवार, 13 जून रोजी माहिती व तंत्रज्ञान मंत्री तथा मुंबई उपनगर जिल्हा पालकमंत्री आशिष शेलार Ashish Shelar यांनी केले. या सोहळ्यास मुंबईच्या महापौर रितू तावडे Mayor of Mumbai व आमदार मुरजी पटेल MLA Murji Patel प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

bmc school1

”आपल्या मुंबईतील विद्यार्थ्यांना आधुनिक, दर्जेदार आणि हक्काचे शिक्षण मिळावे यासाठी महानगरपालिका सातत्याने प्रयत्नशील आहे,” असे उदगार महापौर तावडे यांनी याप्रसंगी काढले. यावेळी प्रभाग समिती अध्यक्ष प्रकाश मुसळे Corporator Prakash Musle, नगरसेविका केशरबेन पटेल Corporator Kesharben Patel, नगरसेविका ममता यादव Corporator Mamta Yadav, नगरसेविका दिशा यादव Corporator Disha Yadav, नगरसेविका अंजली सामंत Corporator Anjali Yadav, नगरसेवक रितेश राय Corporator Ritesh Rai, माजी नगरसेवक कमलेश राय, उप आयुक्त (शिक्षण) डॉ. (श्रीमती) प्राची जांभेकर, एच पश्चिम विभागाचे सहाय्यक आयुक्त दिनेश पल्लेवाड, शिक्षणाधिकारी सुजाता खरे, शिक्षणाधिकारी कीर्तीवर्धन कीरतकुडवे यांच्यासह अन्य अधिकारी, पालक आणि नागरिक उपस्थित होते.