planting

जागतिक पर्यावरण दिन World Environment Day २०२६ निमित्त सलाम बॉम्बे फाउंडेशन Salaam Bombay Foundation, नरोतम सेखसरिया फाउंडेशन Narotam Sekhsaria Foundation आणि इंडिया पोस्ट India Post यांच्या संयुक्त विद्यमाने मुंबई पोस्ट कार्यालय परिसरात “गो ग्रीन इनिशिएटिव्ह – मिशन २५००” अंतर्गत वृक्षारोपण उपक्रम राबविण्यात आला.

whatsapp image 2026 06 10 at 10.34.19

फाउंडेशनच्या HR शाश्वत उपक्रमांतर्गत कोविड काळापासून कर्मचारी वृक्षारोपण आणि पर्यावरणपूरक उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेत आहेत.

फाउंडेशनतर्फे झिरो वेस्ट पद्धती, प्लास्टिक रिसायकलिंग, कर्मचारी वेलबीइंग उपक्रम तसेच नारळाच्या करवंट्या बीएमसीच्या शिवडी येथील नारळ कचरा विभागाला पुनर्वापरासाठी देण्याचे उपक्रम सातत्याने राबविण्यात येत आहेत.

whatsapp image 2026 06 10 at 10.34.17

या माध्यमातून सलाम बॉम्बे फाउंडेशन नागरिकांनी पर्यावरण जपणे, संवर्धन करणे आणि दैनंदिन जीवनात पर्यावरणपूरक सवयी अंगीकारणे आवश्यक असल्याचा संदेश देत आहे.

-शुभम पेडामकर