उसरणी: भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त, उसरणी येथील बौद्ध समाज मंदिरात विविध सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. बौद्ध युवक मंडळ, उसरणी यांच्या वतीने हा सोहळा ११ एप्रिल ते १४ एप्रिल २०२६ या कालावधीत आयोजित करण्यात आला आहे.
या सोहळ्याची सुरुवात ११ एप्रिल रोजी रात्री ९ वाजता नाईट क्रिकेट स्पर्धेने होईल. १२ एप्रिल रोजी मुलांचे खेळ, महिलांसाठी ‘होम मिनिस्टर’ हा विशेष कार्यक्रम आणि शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप आयोजित केले जाईल. त्याच संध्याकाळी सामुदायिक भोजनाचेही आयोजन करण्यात आले आहे.
१३ एप्रिल रोजी सांस्कृतिक कार्यक्रम, बक्षीस वितरण आणि सन्मान सोहळा आयोजित केला जाईल. मध्यरात्री सामुदायिक बुद्ध वंदना होईल. १४ एप्रिल रोजी, सकाळच्या बुद्ध वंदनेने, दुपारच्या भव्य मिरवणुकीने आणि सामुदायिक भोजनाने या उत्सवाची सांगता होईल.
आयोजकांनी परिसरातील नागरिकांना मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.

