शौर्य बहुउद्देशीय संस्था व प्रसन्न फाउंडेशन यांचे कार्यक्रमास मोलाचे सहकार्य

मुंबई – रुग्ण मित्र साथी संस्था आणि अनिद्य क्लासेस यांच्या संयुक्त विद्यमाने चेंबूर येथे नुकताच महिला दिन साजरा करण्यात आला. यावेळी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांचा सन्मान करण्यात आला. कार्यक्रमास नगरसेविका आशा मराठे प्रमुख पाहुण्या म्हणून तर माहिती अधिकार कार्यकर्ता अनिल गलगली विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते. यावेळी आपत्कालीन व्यवस्थापन विभागाच्या प्रमुख रश्मी लोखंडे, रुग्ण मित्र विनोद साडविलकर, धनंजय पवार, सुधाकर अभंग, अनिदय क्लासेसच्या संचालिका डॉ. छाया भटनागर आदी मान्यवर उपस्थित होते.

या कार्यक्रमात सार्वजनिक सेवेसह विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिला अधिकारी व कर्तृत्ववान महिलांचा सन्मान करण्यात आला. यामध्ये पोलीस निरीक्षक ज्योती प्रफुल्ल गायकवाड (चेंबूर), पल्लवी रमेश जाधव (रहदारी विभाग), स्नेहल प्रभाकर अडविकार, रश्मी राजेंद्र लोखंडे (डिझास्टर रिस्क मॅनेजमेंट अधिकारी), १७ वेळा रक्तदान करणाऱ्या अक्षता अजित पावरीकर, दंतचिकित्सा क्षेत्रातील डॉ. प्रज्ञा सावंत, महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागातील उषा आणि आंतरराष्ट्रीय वेटलिफ्टर नीता नवार यांचा समावेश होता. स्मृतीचिन्ह आणि मानपत्र असे सन्मानाचे स्वरूप होते.

कार्यक्रमाच्या दुसऱ्या सत्रात रुग्णमित्र नेटवर्क व सहयोगी संस्थांतील बारा समर्पित महिलांचा सन्मान करण्यात आला. यामध्ये प्रज्वला इंगळे, अमृता पुरंदरे, श्वेता सावंत, ज्योती जोशी, प्रभा सावळ, नयना साळवी, श्रद्धा अष्टीवकर, दीपाली गिजरे, रेहाना शेख, जयश्री मोहिते-नवार, श्रुती गमरे आणि कल्पना पिंजरकर यांचा समावेश होता. या सर्व महिला समाजात महत्त्वपूर्ण योगदान देत आहेत.

अनिद्य क्लासेसच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमांच्या सादरीकरणाने वातावरण उल्हासित झाले. अदिती आणि अनुष्का यांच्या सुंदर नृत्याने प्रेक्षकांची मने जिंकली. तसेच अदिती, अनुष्का, धैर्यशील, सम्राट आणि अवनी यांनी सादर केलेल्या महिला सक्षमीकरणावर आधारित नाटिकेने उपस्थितांना विचार करायला भाग पाडले. या सादरीकरणांनी डॉ. छाया भटनागर यांनी अनिद्यमध्ये जोपासलेली सर्वांगीण शिक्षणाची भावना अधोरेखित केली. जिथे विद्यार्थ्यांना केवळ अभ्यासच नव्हे तर विचार,भावना आणि सादरीकरणाचीही शिकवण दिली जाते.

या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनामागे अनिद्यच्या शिक्षकवर्गाचे विशेष योगदान आहे. मंजुला कदम (प्राथमिक विभाग), रेणू गुप्ता (प्री-प्रायमरी विभाग), स्वेता सुंदर कनगियल्ला (सीनियर विभाग) आणि कल्याणी शिंदे यांनी पडद्यामागे अथक परिश्रम घेऊन कार्यक्रम सुरळीत पार पाडला.

कल्पना पिंजरकरांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. श्रध्दा अष्टीवकर यांनी ग्राफीक्सची जबाबदारी पार पडली. किरण साळवे यांच्या शौर्य बहुउद्देशीय संस्था व प्रसन्न फाउंडेशन यांचे कार्यक्रमास मोलाचे सहकार्य लाभले. यावेळी रुग्ण मित्र साथी रमेश चव्हाण, प्रफुल्ल नवार, अमोल सावंत, श्रद्धा बनसोडे, चारुदत्त पावसकर, विनोद चाळके, अमिता शर्मा, शांताराम मोरे, हणमंत शिर्के, हर्षल जाधव, गणेश पवार, पूजा निकाळजे आदी सामाजिक क्षेत्रातील मान्यवर मंडळी देखील उपस्थित होते.