andheri mogra nullah

सात महिने वाहतूक बंद राहणार

अंधेरी : पश्चिम अंधेरीतील मोगरा नाल्यावरील पूल पाडून त्याची नव्याने उभारणी करण्यात येणार आहे. या कामामुळे संबंधित पुलावरील वाहनांची वाहतूक सात महिन्यांसाठी पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती वाहतूक पोलिसांनी दिली आहे. मुंबई महापालिकेकडून (BMC) मे २०२७ पर्यंत पुलाचे पाडकाम आणि पुनर्बांधणी करण्यात येणार आहे.

सब टीव्ही रोडला लिंक रोडशी जोडणारा हा पूल जीर्ण अवस्थेला आला आहे. त्यामुळे हा पूल पाडून नव्याने बांधण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या कालावधीत वाहनचालकांची गैरसोय टाळण्यासाठी वाहतूक पोलिसांनी पर्यायी मार्गांची व्यवस्था जाहीर केली आहे.

वाहनचालकांसाठी पर्यायी मार्ग

1. लोखंडवाला कॉम्प्लेक्स रोडवरून येणाऱ्या हलक्या वाहनांसाठी : सब टीव्ही रोड (प्रमोद नवलकर मार्ग) येथील दक्षिणवाहिनीवरून येणाऱ्या हलक्या वाहनांनी डावीकडे वळावे. त्यानंतर हॉटेल एम्पायर येथे उजवीकडे वळून हॉटेल कलिंगामार्गे न्यू लिंक रोडने पुढील इच्छित स्थळी जावे.

2. न्यू लिंक रोडवरून येणाऱ्या हलक्या वाहनांसाठी : न्यू लिंक रोडच्या उत्तरवाहिनीवरून येणाऱ्या वाहनांनी हॉटेल कलिंगा येथे डावीकडे वळावे. त्यानंतर हॉटेल एम्पायर येथे डावीकडे किंवा उजवीकडे वळून लोकांदवाला कॉम्प्लेक्स रोडमार्गे पुढील इच्छित स्थळी जावे.

पुलाच्या पुनर्बांधणीच्या कालावधीत या परिसरातील वाहतूक व्यवस्थेत बदल राहणार असल्याने वाहनचालकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन वाहतूक पोलिसांकडून करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *