umesh rane 750x375

अंधेरी: भारतीय जनता पक्षाने BJP मुंबई प्रदेश कार्यकारिणी सदस्यांची बुधवारी नियुक्ती केली. अंधेरी भाजपा नेते उमेश राणे यांची कार्यकारिणी सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे.

उमेश राणे हे तीन दशकांपासून सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात कार्यरत आहेत. महानगरपालिकेची निवडणूक BMC Election सुद्धा त्यांनी लढवलेली आहे. सर्वसामान्यांच्या मदतीला धावून जाणारा कार्यकर्ता अशी त्यांची जनमानसांत प्रतिमा आहे. भाजपा मुंबई प्रदेश कार्यकारिणी सदस्य म्हणून नियुक्ती झाल्यामुळे समाजातील सर्वच स्तरांतून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

आपल्या नियुक्तीबद्दल आनंद व्यक्त करताना उमेश राणे यांनी भाजप मुंबई BJP Mumbai प्रदेशाध्यक्ष आमदार अमीत साटम ASatam, महामंत्री आचार्य पवन त्रिपाठी Acharya Pavan Tripathi आणि अंधेरीचे Andheri आमदार मुरजी पटेल Murji Patel यांचे आभार मानले आहेत. या नियुक्तीमुळे सर्वसामान्यांसाठी लढण्याचे बळ मिळाले असून संघटनात्मक बांधणीसाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे राणे यांनी म्हटले.

umesh rane