history dept

‘ग्रंथामधला इतिहास’ प्रदर्शनातून इतिहासाचा समृद्ध वारसा विद्यार्थ्यांसमोर

विरार : विवा महाविद्यालयाच्या ग्रंथालय विभाग आणि इतिहास विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने दि. २९ जुलै ते १ ऑगस्ट २०२६ या कालावधीत महाविद्यालयाच्या ग्रंथालयातील वाचन कक्षामध्ये ‘ग्रंथामधला इतिहास : एक प्रदर्शनी’ या विषयावरील पुस्तक प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले. या प्रदर्शनाचे उद्घाटन महाविद्यालयाच्या उपप्राचार्या डॉ. प्राजक्ता परांजपे यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी बोलताना त्यांनी, “ग्रंथ हेच आपल्या जीवनातील सर्वोत्तम गुरु आहेत. इतिहास हा भूतकाळाचा आरसा असून तो भविष्याला दिशा देणारा मार्गदर्शक आहे. इतिहासातील घटना आणि अनुभवांमधून प्रेरणा घेतल्यास अधिक सक्षम समाज घडविता येतो,” असे प्रतिपादन केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक इतिहास विभाग प्रमुख व सहाय्यक प्राध्यापिका जान्हवी नाईक यांनी केले, तर आभार प्रदर्शन ग्रंथपाल डॉ. नागरत्ना पलोटी यांनी केले तसेच अंजली परांजपे अन्य ग्रंथालयातील सहकारी सदस्य, इतिहास विभागातील सहाय्यक शिक्षक, नॉलेज बीज समितीचे विद्यार्थी, कला शाखेतील इतिहास विभागाच्या विद्यार्थ्यांनी या प्रदर्शनाचे यशस्वीरित्या नियोजन केले.

इतिहासाची समृद्ध परंपरा, वाचन संस्कृती आणि संशोधनाची आवड विद्यार्थ्यांमध्ये रुजविण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या प्रदर्शनाला विद्यार्थी व शिक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या प्रदर्शनामध्ये जागतिक इतिहास, भारतीय इतिहास, महाराष्ट्राचा इतिहास, स्वातंत्र्य चळवळ, महान नेते, ऐतिहासिक व्यक्तिमत्त्वे, संस्कृती, वारसा आदी विषयांवरील संदर्भग्रंथ प्रदर्शित करण्यात आले.

प्रभारी प्राचार्या यांच्या कार्यालयातून प्राप्त झालेल्या माहितीनुसार, इतिहास विभागाच्या विद्यार्थ्यांनी निवडक पुस्तकांचे परीक्षण सादर करून इतिहास अभ्यासाकडे चिकित्सक दृष्टीकोनातून पाहण्याचा प्रयत्न केला. याशिवाय ‘गुरुकुल शिक्षण पद्धती’ या विषयावरील माहितीपूर्ण पोस्टर्स प्रदर्शनाचे विशेष आकर्षण ठरले.

या उपक्रमास विष्णू वामन ठाकूर चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष मा. हितेंद्रजी ठाकूर, संस्थेच्या सेक्रेटरी अपर्णा ठाकूर, संस्थेचे खजिनदार शिखर हितेंद्र ठाकूर, व्यवस्थापन समितीचे सदस्य संजीव पाटील, संजय पिंगुळकर, एस. एन. पाध्ये, विवा महाविद्यालयाचे समन्वयक नारायण कुट्टी, प्रभारी प्राचार्या डॉ. दीपा वर्मा यांनी मोलाचे सहाय्य केले. या प्रदर्शनास महाविद्यालयातील विविध विभागातील सहाय्यक शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली. ज्ञान, इतिहास आणि वाचन संस्कृती यांचा प्रभावी संगम घडविणारा हा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *