अंधेरी- भाजप प्रभाग क्र. ७५ च्या वतीने शनिवारी मरोळ(Marol)मधील स्वयंभू पालेश्वर मंदिर येथे जागतिक योग दिवस(International Yoga Day) साजरा करण्यात आला. यावेळी `एक झाड आईच्या नावे’ या उपक्रमांतर्गत वृक्षारोपण देखील करण्यात आले.
21 जून हा दिवस जागतिक योग दिवस म्हणून जगभर साजरा करण्यात येतो. योग ही भारताने जगाला दिलेली देणगी आहे. त्यामुळे भारतात हा दिवस उत्साहात साजरा करण्यात येतो. अगदी शिशु वर्गापासून ते राष्ट्रपती भवन पर्यंत योगाभ्यास केला जातो. मरोळमधील भाजप कार्यकर्त्यांनी देखील शनिवारी सकाळी 7 वाजता योगाभ्यास केला. त्यानंतर आईच्या नावे एक झाड लावून वृक्षारोपण केले.
”नियमित योगाभ्यास केल्याने मानसिक आणि शारीरिक शक्ती वाढते. आपला भारताने तर जगाला योगाभ्यासाची देणगी दिली आहे. त्यामुळेच जगभरात योग दिवस साजरा केला जातो हे प्रत्येक भारतीयासाठी स्पृहणीय आहे. तसेच वृक्षारोपणामुळे पर्यावरणाची ताकद वाढते. या दोन्ही बाबी लक्षात घेऊन आम्ही योगाभ्यास केला आणि सोबत आईच्या नावाने वृक्षारोपण केले,” अशा शब्दांत भाजप नेते उमेश राणे यांनी माहिती दिली.





