विरार : विवा महाविद्यालयाच्या ग्रंथालय विभागातर्फे स्वामी विवेकानंद यांच्या जन्मदिवसाचे औचित्य साधून “ज्ञानोत्सव- Library Week –” या संकल्पनेअंतर्गत दिनांक १२ जानेवारी ते १४ जानेवारी २०२६ या कालावधीत विविध अभिनव स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.

या वर्षी ग्रंथालय विभाग आणि नॉलेज बीस कमिटी सदस्यांनी ज्ञानोत्सव संकल्पना राबवून या सप्ताहात विविध स्पर्धा आयोजित केल्या होत्या. यामध्ये सूडोकू, वर्ड सर्च, मिनिट इन मार्केटिंग, फिल्म रिविव्ह इत्यादी अशा नाविन्यपूर्ण स्पर्धांचा समावेश होता. या सर्व स्पर्धा विद्यार्थी, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी अशा तिन्ही गटांसाठी खुल्या होत्या. या उपक्रमाला उत्स्फूर्त व अभूतपूर्व प्रतिसाद लाभला असून एकूण ४४५ स्पर्धकांनी नोंदणी केली होती.

या ज्ञानोत्सवाचा सांगता समारंभ दिनांक १६ जानेवारी २०२६ रोजी ग्रंथालयाच्या वाचन कक्षात पारितोषिक वितरण समारंभाने संपन्न झाला. या कार्यक्रमास विवा महाविद्यालयाच्या उपप्राचार्या डॉ. प्राजक्ता परांजपे , उत्कर्ष विद्यालय व महाविद्यालयाच्या सेवानिवृत्त शिक्षिका मनीषा चौबळ मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व सरस्वती वंदनाने करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक ग्रंथपाल डॉ. नागरत्ना पलोटी यांनी केले. यावेळी उपप्राचार्या डॉ. प्राजक्ता परांजपे यांनी उपस्थितांना मोलाचे मार्गदर्शन केले. या प्रसंगी महाविद्यालयाचे विद्यार्थी, शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या प्रसंगी महाविद्यालयाचा विद्यार्थी क्रिश सुवर्ण यांनी तबलावादन सादर करून उपस्थितांची दाद मिळविली. तसेच, या प्रसंगी आयोजित करण्यात आलेल्या सर्व स्पर्धांचा सविस्तर वृत्तांत चित्रफितीच्या माध्यमातून उपस्थित प्रेक्षकांसमोर सादर करण्यात आला.

स्पर्धेतील विजेत्यांना मान्यवर अतिथींच्या हस्ते प्रशस्तिपत्रक देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन सौ. अंजली परांजपे यांनी केले.