अंधेरी: यंदा उन्हाळ्यामध्ये सूर्य जणू आग ओकत आहे. संपूर्ण भारतात उन्हाची तीव्र परिस्थिती आहे. या वाढत्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील घराबाहेर राहून काम करणाऱ्या कामगारांना पाठिंबा देण्यासाठी रॉबिन हूड आर्मीच्या अंधेरी पूर्व शाखेच्या स्वयंसेवकांनी ‘बीट द हीट’ (उष्णतेवर मात करा) मोहीम सुरू केली आहे.

गेल्या दोन आठवड्यांत, त्यांनी जुहू आणि विले पार्ले पूर्व यांसारख्या भागांमध्ये २,००० हून अधिक नागरिकांना थंड पेयांचे वाटप केले आहे. अतिरिक्त अन्नाच्या पुनर्वितरणासाठी ओळखली जाणारी ही संस्था आहे. समाजोपयोगी उपक्रम आणि शिक्षण-केंद्रित उपक्रम राबवून रॉबिन हूड अकादमीच्या माध्यमातून संस्था आपल्या सामाजिक कार्याचा विस्तार करत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *