bjp vs ubt

अंधेरी: बुधवारी अंधेरीसह Andheri मुंबईच्या Mumbai Suburb काही उपनगरात मान्सूनपूर्व पावसाने Pre Monsoon Rain हजेरी लावली. या पावसामुळे अंधेरी सबवे येथे पाणी साचले. हे पाणी काढण्यासाठी महापालिका प्रशासन BMC आणि वाहतूक पोलिसांनी Mumbai Traffic Police तासभर अंधेरी सबवे येथील वाहतूक बंद ठेवली होती. या मुद्द्यावरून आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि भाजप मुंबई प्रदेश यांच्यामध्ये एक्स वॉर सुरू झाले आहे.

अंधेरी सबवे Andheri Subway मध्ये पाणी तुंबल्याने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे Shivsena Uddhav Balasaheb Thackeray पक्षाच्या एक्स या समाज माध्यमाच्या अधिकृत अकाऊंटवरुन भाजपवर BJP टीका केली आहे. त्यांनी भाजप मुंबई अध्यक्ष अमित साटम BJP Mumbai President Amit Satam यांना लक्ष्य करत साटम यांचा दावा फोल ठरल्याची टीका केली आहे.

ssxbjp

या टीकेला प्रत्युत्तर देताना बीजेपी मुंबईच्या अधिकृत x अकाऊंट वरुन म्हटले आहे की,

अंधेरी सबवे तुंबणार नाही असा दावा आम्ही कधीच केला न्हवता. आमचे प्रशासन आयआयटी मुंबई सोबत यावर कायमचा तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करतेय ज्यामुळे मुंबईकरांचे जास्तीचे पैसेही खर्च होणार नाहीत. गेल्या २५ वर्षात मुंबईवर डल्ला मारून, मुंबई लुटली,आठवड्याच्या स्टँडिंगच्या ५ टक्क्यांवर जगून मातोश्री २ बांधली, पण मुंबईसाठी काही केले नाही. तुम्ही मुंबईसाठी आणि मराठी माणसासाठी केलेले एकही काम दाखवू शकत नाही त्यामुळे उ. मामु आणि पेंग्विन ने आपले तोंड बंद ठेवावे!

भाजपच्या या प्रत्युत्तरावर एक्स यूझर्स यांनी देखील सडेतोड कमेंट्स केलेल्या आहेत.

comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *