मुंबई: विलेपार्ले (Vileparle burglary) पूर्वेकडील (Vileparle East Theft) नेहरू रोडवरील एका निवासी बंगल्यात मंगळवारी दिवसाढवळ्या चोरी (Mumbai Daylight Burglary) झाली. चोरांनी सुमारे ४१ लाख रुपयांचे दागिने आणि मौल्यवान वस्तू लंपास केल्या.
सदर बंगल्यात एक जोडपे राहते. हे जोडपे अर्ध्या तासासाठी घराबाहेर असताना ही घटना घडली. घरी परतल्यावर त्यांना घराची तोडफोड (Mumbai House Breaking) झालेली तसेच मुख्य दरवाजाची कडी तुटलेली आढळली. घरमालकांनी तात्काळ पोलिसांना कळवले. विलेपार्ले पोलिस ठाण्याचे (Vileparle Police Station) अधिकारी घटनास्थळी पोहोचले आणि तपास सुरू केला.
बंगल्याच्या परिसरात कॅमेरे नसल्यामुळे घुसखोरांचे कोणतेही थेट फुटेज उपलब्ध नाहीत. संशयितांना शोधण्यासाठी पोलिस पथके आता जवळच्या परिसरातील सीसीटीव्ही रेकॉर्डिंग्ज तपासत आहेत. पोलिसांना संशय आहे की हा गुन्हा पूर्वनियोजित होता. घरफोडीच्या अचूक वेळेवरून असे दिसून येते की चोरट्यांनी घरमालक असलेल्या जोडप्याच्या दैनंदिन दिनचर्येचा अभ्यास करून घरावर पाळत ठेवली होती.
