आर्यन मेहताने केले ‘रंगरेझ’मध्ये दमदार पदार्पण

प्रसिद्ध चित्रपट निर्माते प्राणलाल मेहता यांचे नातू आणि निर्माते जय मेहता यांचे पुत्र आर्यन मेहता यांनी शेक्सपियरच्या प्रतिष्ठित शोकांतिका ‘ओथेलो’च्या महत्त्वाकांक्षी भारतीय रूपांतरण असलेल्या ‘रंगरेझ’मधून आपल्या बहुप्रतिक्षित अभिनयाच्या कारकिर्दीला सुरुवात केली. त्याच्या अभिनयामुळे त्याला भारतीय रंगभूमीवरील सर्वात आश्वासक नवीन कलाकारांपैकी एक म्हणून त्वरित ओळख मिळाली.

‘रंगरेझ’मध्ये आर्यनने अथर्व हे पात्र साकारले आहे, जो एक स्वबळावर यशस्वी झालेला, आकर्षक तरुण आहे, ज्याचे प्रेम आणि निष्ठेवर आधारित आयुष्य, काळजीपूर्वक पेरलेल्या शंकांच्या ओझ्याखाली हळूहळू उद्ध्वस्त होते. त्याचा हा अधःपतन, शांत, आंतरिक आणि विनाशकारी होता, ज्यासाठी भावनिक गुंतागुंत, सूक्ष्मता आणि संपूर्ण प्रामाणिकपणाची आवश्यकता होती. आर्यनने हे सर्व आश्चर्यकारक आत्मविश्वासाने साकारले.

रंगमंचावर येण्यापूर्वी, आर्यनने कॅमेऱ्यामागे काम केले होते, जिथे त्याने धर्मा प्रॉडक्शन्सच्या (Dharma Productions) ‘नादानियाँ’ (Nadaniya) आणि संदीप वंगा यांच्या ब्लॉकबस्टर ‘ॲनिमल’ (Animal)सारख्या प्रकल्पांमध्ये योगदान दिले. या पडद्यामागील अनुभवाने एक भक्कम कलात्मक पाया तयार केला, ज्याचा उपयोग ‘रंगरेझ’मध्ये त्याने उल्लेखनीय कौशल्याने केला. आपल्या अनुभवावर मनन करत आर्यन म्हणाला, “एक नवोदित कलाकार म्हणून, ‘रंगरेज’मध्ये काम करणे म्हणजे जणू आगीत पाऊल ठेवण्यासारखे होते आणि त्यातूनच स्वतःचे सत्य शोधण्यासारखे होते. अथर्व ही अशी भूमिका होती, ज्यासाठी असुरक्षितता, धैर्य आणि संपूर्ण प्रामाणिकपणाची गरज होती, आणि यापेक्षा अधिक आव्हानात्मक सुरुवात मी मागूच शकलो नसतो. हे पदार्पण केवळ लोकांसमोर येण्यापुरते नव्हते; तर लोकांना भावतील अशा कथा सांगण्यासाठी मी तयार आहे हे स्वतःला सिद्ध करण्याबद्दल होते. ‘रंगरेज’ हा माझ्या प्रवासातील पहिला अध्याय होता, आणि मी माझे सर्वस्व त्यात ओतले.”

या नाटकाचे दिग्दर्शन, रचना आणि सादरीकरण प्रसिद्ध नाट्यकर्मी अतुल सत्य कौशिक यांनी केले होते, जे भारतीय ओथेलोची भूमिका अस्सलपणे साकारण्यासाठी एका २३ वर्षीय तरुणाच्या शोधात होते. ज्येष्ठ कलाकार दलीप ताहिल आणि मोहक मीनाक्षी दीक्षित यांच्या अभिनयाने सजलेल्या या नाटकात, अनिक शर्मा यांच्या वातावरणीय संगीताची जोड देऊन, एक अत्यंत प्रभावी अनुभव निर्माण करण्यात आला होता.

आपल्या पदार्पणानंतर, आर्यन मेहता या वर्षातील सर्वात आश्वासक नवीन अभिनेत्यांपैकी एक म्हणून उदयास आला आहे, आणि त्याने आपल्या प्रामाणिकपणा, पडद्यावरील उपस्थिती आणि भावनिक खोलीसाठी प्रशंसा मिळवली आहे.

या संध्याकाळी दीपिका सिंग, जयंती भाटिया, अंकुर पांचाल, किशोरी शहाणे, बॉबी विज, स्मिता बन्सल, येशा रुघानी, प्राचीन चौहान, दिशांक अरोरा, कीर्ती केळकर, ईशान धवन, प्रियांशी यादव, राजेश बलवाणी, विवान बेदी, ईशान सूद, शैलेश लोढा, मानिनी डे, निवेदिता बसू, राजीव पॉल, श्रीजिता डे, अमर उपाध्याय, अनुश्री मेहता, अबीर सेन गुप्ता, हादी अली अबरार, राजन शाही, इशिका शाही, डॉ. समीरा गुप्ता, हॅरी आनंद आणि इतर अनेक मान्यवर उपस्थित होते.