powai college

आयआरएस अधिकारी समीर वानखेडे यांनी विद्यार्थ्यांना केले मार्गदर्शन

पवई, २९ ऑगस्ट २०२६ : चंद्रभान शर्मा कला, वाणिज्य व विज्ञान स्वायत्त महाविद्यालय आणि भारत विकास परिषद, पवई-चांदिवली शाखा, कोकण प्रांत यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी ‘ड्रग्स अवेअरनेस प्रोग्राम’ अर्थात अमली पदार्थविरोधी जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. सकाळी ११ ते दुपारी १२.३० या वेळेत झालेल्या या कार्यक्रमाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते समीर वानखेडे ( IRS, अतिरिक्त संचालक, DGTS, चेन्नई) होते. त्यांनी आपल्या प्रभावी आणि विचारप्रवर्तक मार्गदर्शनातून अमली पदार्थांच्या सेवनामुळे होणारे शारीरिक, मानसिक तसेच सामाजिक दुष्परिणाम विद्यार्थ्यांसमोर मांडले. युवकांनी व्यसनांपासून दूर राहून सकारात्मक विचार, शिस्त आणि जबाबदार जीवनशैली स्वीकारावी, असे आवाहन त्यांनी केले.

whatsapp image 2026 09 01 at 12.45.05

वानखेडे यांच्या प्रेरणादायी भाषणाने विद्यार्थ्यांमध्ये व्यसनमुक्त जीवनाबाबत जागरूकता निर्माण झाली. त्यांनी विद्यार्थ्यांना जीवनातील योग्य निर्णय घेण्याचे महत्त्व पटवून दिले. कार्यक्रमाच्या शेवटी विद्यार्थ्यांनी अमली पदार्थांपासून दूर राहण्याची आणि समाजात व्यसनमुक्तीचा संदेश पोहोचविण्याची शपथ घेतली.

या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी चंद्रभान शर्मा महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. वैशाली राजपूत यांच्या नेतृत्वाखाली पार पडला. महाविद्यालयाचे व्यवस्थापकीय विश्वस्त प्रशांत शर्मा यांनी दिलेल्या संधीमुळे नेहमीच विद्यार्थ्यांसाठी जनजागृतीपर कर्यक्रम राबवण्यात येतात. विद्यार्थी कल्याण, सामाजिक बांधिलकी आणि युवकांमध्ये जनजागृती निर्माण करण्यासाठी महाविद्यालयाने घेतलेला हा पुढाकार निश्चितच उल्लेखनीय ठरला.

whatsapp image 2026 09 01 at 12.45.05(2)

यावेळी भारत विकास परिषद आणि महाविद्यालयाच्या वतीने समीर वानखेडे यांचे विशेष आभार मानण्यात आले. त्यांच्या मौल्यवान वेळेतून विद्यार्थ्यांना मिळालेले मार्गदर्शन प्रेरणादायी ठरले.

“व्यसनांना नकार देऊन आरोग्यदायी आणि उज्ज्वल भविष्याकडे वाटचाल करा,” हा संदेश देत कार्यक्रमाची सांगता झाली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *