andheri bus (1)

ब्रेक निकामी झाल्यामुळे झाला अपघात; सहा जण जखमी

अंधेरी: शुक्रवारी दुपारी ३.४० च्या सुमारास अंधेरी पश्चिमच्या आंबोली येथे ब्रेक निकामी झाल्यामुळे एका सीएनजी बेस्ट बसचा अपघात झाला. डीएन नगर पोलिसांनी सांगितले की, मार्ग क्रमांक २४२ वर धावणाऱ्या या वेट लीज बसने उभ्या असलेल्या किमान १४ वाहनांना धडक दिली. त्यात किमान सहा जण जखमी झाले. प्राथमिक माहितीनुसार, अंधेरी सबवे जवळ एसव्ही रोडवर उजवीकडे वळताना बस नियंत्रणाबाहेर गेली.

बस चालक, ३० वर्षीय साहिल सूर्यकांत सावंत आणि वाहक, ३५ वर्षीय किरण आप्पा चव्हाण, हे दोघेही वेट लीज एमयूटी कर्मचारी असून, त्यांना चौकशीसाठी डीएन नगर पोलीस ठाण्यात नेण्यात आले.

डीएन नगर वाहतूक पोलिसांच्या सुमारे १० अधिकाऱ्यांनी घटनास्थळावरून वाहतूक सुरळीत केली. दोन तासांत परिस्थिती पूर्ववत झाली, असे डीएन नगर वाहतूक पोलिसांच्या उपनिरीक्षक ज्योती हिबारे यांनी सांगितले.

“प्राथमिक चौकशीत असे दिसून आले आहे की, ब्रेक निकामी झाले होते. आम्ही प्रत्यक्षदर्शींचे जबाब नोंदवले आहेत. सीसीटीव्ही फुटेज तपासले जाईल आणि आम्ही या प्रकरणी एफआयआर दाखल करणार आहोत,” असे डीएन नगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन गवस यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *