sahyadri sion pratishthan

कशेडीतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य

सायन: मुंबईच्या सायन येथील सह्याद्री सायन प्रतिष्ठानने सह्यादीच्या कुशीत असणाऱ्या खेड तालुक्यातील कशेडी गावातील जिल्हा परिषद मराठी शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करून समाजसेवेचा आदर्श घालून दिला. कशेडी गावाचे मूळ रहिवासी विश्वनाथ खळे यांच्या माध्यमातून गावाशी जुळलेल्या जिव्हाळ्याच्या नात्यातून हा उपक्रम राबविण्यात आला.

sahyadri sion pratishthan1

दरवर्षी गावाला भेट देणाऱ्या मित्र परिवाराने गावकऱ्यांकडून मिळणाऱ्या प्रेम आणि आपुलकीची परतफेड म्हणून विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी स्वखर्चाने शैक्षणिक साहित्याचे वितरण केले. या उपक्रमाचे ग्रामस्थांनी स्वागत करत मित्र परिवाराच्या सामाजिक बांधिलकीचे कौतुक केले.

sahyadri sion pratishthan2

या उपक्रमात विश्वनाथ खळे, संगम कोळी, दुर्वेश गावंड, निलेश सोलकर, महेंद्र केणी, अक्षय रेवाळे, सुशांत रेवाळे, प्रशांत बामणे आणि सूरज बंगाल यांनी सहभाग घेतला.