book distribute event1

300 विद्यार्थ्यांची उपस्थिती

अंधेरी: भारतीय जनता पार्टीच्या वॉर्ड क्र. ७५ तर्फे मरोळच्या सागबाग महानगरपालिकेच्या शालेय विद्यार्थ्यांना मोफत वह्यांचे वाटप करण्यात आले. यावेळी तब्बल ३०० विद्यार्थ्यांना मोफत वह्यांचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाचे आयोजन मंगेश परब यांनी केले.

यावेळी प्रभाग समिती अध्यक्ष व नगरसेवक प्रकाश मुसळे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. भाजप मुंबई कार्यकारिणी सदस्य उमेश राणे, भाजप मंडल अध्यक्ष सुकदेव गायकवाड, कार्यकर्ता सुशील सिंग, वीरेंद्र परब यांच्यासह अन्य नागरिक उपस्थित होते.