मुंबई- सेंटर फॉर प्रमोटिंग डेमोक्रेसी (सीपीडि) मुंबईतील रस्त्यावर संसार मांडावा लागलेल्या समाज समुहांच्या हक्कासाठी लढा देत आहे. या लढ्याचा भाग म्हणून रस्त्यावर राहणाऱ्या पारधी समाजासाठी काली बिल्ली प्रॉडक्शनच्या सावित्री मेधातुल आपल्या “महोगाथा” नाटकाद्वारे या लढ्याला पाठिंबा देणार आहे.

काली बिल्ली प्रॉडक्शन तर्फे बुधवार, १३ मे २०२६ रोजी सायंकाळी ६:३० वाजता “महोगाथा” नाटकाचा एक प्रयोग आयोजित करण्यात आला आहे. हा नाट्यप्रयोग विनामूल्य असून पु. ल. देशपांडे अकादमी, प्रभादेवी येथील मिनी थिएटर मध्ये रंगणार आहे. सेंटर फॉर प्रमोटिंग डेमोक्रेसीने एक छोटसं प्रदर्शन देखील आयोजित केलं आहे. हा नाट्यप्रयोग पाहण्यासाठी सर्वांनी आवर्जून यावे असे निमंत्रण सीपीडिने दिले आहे.

अधिक माहितीसाठी सिताराम शेलार-९८३३२५२४७२ यांच्याशी संपर्क साधावा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *