RT4

विलेपार्ले- विलेपार्ले सांस्कृतिक केंद्र आणि स्वच्छ पार्ले अभियान यांच्या संयुक्त प्रयत्नांतून साकारलेल्या मुंबईतील पहिल्या शहरी शेती व फुलपाखरू उद्यान प्रकल्पाचे लोकार्पण मुंबईच्या महापौर रितू तावडे यांच्या हस्ते पार पडले. या प्रसंगी विलेपार्ले विधानसभा आमदार पराग अळवणी, सभागृह नेते गणेश खणकर, सार्वजनिक आरोग्य समिती अध्यक्ष हरिष भांदीर्गे, बाजार व उद्यान समिती अध्यक्षा हेतल गाला, के/दक्षिण विभाग सहाय्यक आयुक्त नितीन शुक्ला, नगरसेवक मिलिंद शिंदे, नगरसेवक अनिष मकवानी, दीपक कोतेकर, नगरसेविका जगदीश्वरी अमीन, नगरसेविका अंजली सामंत, नगरसेविका सुनिता मेहता, सुप्रसिद्ध अभिनेते पुष्कर श्रोत्री तसेच निसर्गप्रेमी मुंबईकर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

RT2 1024x682

”या प्रकल्पाच्या यशस्वी उभारणीसाठी डॉ. सी. एस. लट्टू आणि श्रीमती वर्षा करंबेळकर यांनी घेतलेले विशेष परिश्रम अत्यंत उल्लेखनीय आहेत. मुंबईकरांसाठी हा उपक्रम साकार करण्यात आला असून याचा ते आनंद घेतील आणि त्यामुळे भविष्यात अशा उपक्रमांना अधिक प्रोत्साहन मिळेल, याची खात्री वाटते. पर्यावरणपूरक उपक्रमांना चालना देणारा हा प्रकल्प शहराच्या शाश्वत विकासाच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरणार आहे,”

असे महापौर तावडे म्हणाल्या.