केवळ पुस्तकी ज्ञान म्हणजे आयुष्य नव्हे, तर पुस्तकांच्या पलीकडे जाऊन जगण्याची कला शिकवणारा ‘आउट ऑफ सिल्याबस: पुस्तकांच्या पलीकडे’ या चित्रपटाचा पोस्टर आणि म्युझिक लाँच सोहळा नुकताच मुंबईत दिमाखात संपन्न झाला. परेल येथील ‘आयटीसी ग्रँड सेंट्रल’ या पंचतारांकित हॉटेलमध्ये ९ एप्रिल २०२६ रोजी पार पडलेल्या या सोहळ्याला मराठी सिनेसृष्टीतील दिग्गजांनी मांदियाळी जमली होती.

​प्रसिद्ध दिग्दर्शक आणि अभिनेते महेश मांजरेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा पार पडला. यावेळी वैशाली सामंत, गौरव मोरे, रोहित माने, शिवाली परब, वनिता खरात, रसिका वेंगुर्लेकर, पॅडी कांबळे, कुणाल मेश्राम, अभय जोधपूरकर, सौरभ अभ्यंकर, गोपाळ गावंडे, मोहित कुलकर्णी, संजय पवार आणि मिलिंद शिंदे यांसह अनेक मान्यवर कलाकार उपस्थित होते. या सोहळ्याची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली आहे.

​या चित्रपटातून अजिंक्य राऊत आणि नवोदित अभिनेत्री अद्वयी ही एक नवी कोरी जोडी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. चित्रपटाच्या पोस्टरमध्ये पुस्तकी अभ्यासात मग्न असलेला नायक आणि त्याच्याकडे पाहणारी नायिका असे चित्र दिसत असून, त्यातून कथेविषयी मोठे कुतूहल निर्माण झाले आहे. आयुष्याच्या परीक्षेतील थरार आणि प्रेरणा देणारी ही कथा प्रेक्षकांसाठी नक्कीच वेगळी ठरेल, असा विश्वास निर्मात्यांनी व्यक्त केला.

​”केवळ पुस्तकी परीक्षेत उत्तीर्ण होण्यापेक्षा आयुष्याची परीक्षा यशस्वीपणे पार पाडण्याची प्रेरणा देणारा हा चित्रपट आहे.”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *